-
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी शर्वरीला IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
आयएमडीबी ॲपवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दमदार कामगिरी करणाऱ्या स्टार्सना हा पुरस्कार दिला जातो.
-
एका खास IMDb ‘स्पीड डेटिंग’ सेगमेंटमध्ये शर्वरीला सुट्ट्यांबद्दल विचारले असता, तिने गणेश चतुर्थी या सणाचे तिचे प्रेम व्यक्त केले आहे.
-
शर्वरी म्हणली.. माझी आवडती सुट्टी गणेश चतुर्थी आहे. मला माझ्या मूळ गावी, मोरगावला जायला खूप आवडते.
-
माझ्या कामातून मला मिळालेली ही सर्वोत्तम वेळ आहे आणि मला ते ठिकाण खूप आवडते.
-
मग काहीही असो, दरवर्षी मी गणेश चतुर्थीच्या वेळी वेळ काढून मूळ गावी जाते, आणि ही आतापर्यंतची सर्वोत्तम सुट्टी आहे.
-
आमच्या तिथे एक वाडा आहे आणि तो जवळपास १०० वर्षांहून जुना आहे.
-
मला असे वाटते की शुभ प्रसंगी कुटुंब एकत्र येणे खूप आनंद देते, त्यामुळे मला असे वाटते की माझे वर्ष सुरू होते आणि तिथेच संपते.
-
हा वेळ माझ्या खूप जवळचा आणि माझ्यासाठी खूप प्रिय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास