-
रेखा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री रेखा यांना आजही चाहत्यांची कमतरता नाही. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हिंदी चित्रपटसृष्टीला दिला आहे. त्यांनी लहान वयातच चित्रपटात काम करायला सुरुवात केली.
-
त्या जेव्हा बॉलिवूडमध्ये आल्या तेव्हा खूपच लहान होत्या. त्यांनी वयाच्या पहिल्याच वर्षी १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘इंटी गुट्टू’ मध्ये बाल कलाकार म्हणून छोटी भूमिका केली होती. १९७० मध्ये त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
-
‘सावन भादो’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘उमराव जान’, ‘सिलसिला’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि इतर अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली.
-
रेखा यांनी १८० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला.
-
त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
-
पण आता रेखा काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. त्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी नेहमी चर्चेत येतात.
-
रेखा अनेकदा फंक्शन्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतात. अर्थात, रेखा चित्रपट करत नसल्या तरी इतर अनेक मार्गांनी त्या मोठी कमाई करतात. दरम्यान, अभिनेत्री रेखा यांच्याकडे मुंबई आणि दक्षिण भारतात अनेक मालमत्ता आहेत ज्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत.
-
मालमत्तांमधून मिळणाऱ्या भाड्यातून त्या दरमहा लाखो रुपये कमावतात. याशिवाय टीव्ही मालिका, रिॲलिटी शो आणि इतर फंक्शन्समध्ये पाहुण्या कलाकार म्हणून जात चांगली कमाई करतात. कोणत्याही खाजगी समारंभात सहभागी होण्यासाठी रेखा लाखो रुपये मानधन घेतात.
-
दरम्यान, रेखा राज्यसभा सदस्य आणि खासदार राहिल्या आहेत आणि या काळात त्यांना इतर भत्त्यांसह मोठा पगार मिळत होता. रेखा यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्या ३३२ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालक आहेत. रेखा मुंबईच्या बँड स्टँडमध्ये राहतात आणि त्यांच्या बंगल्याचे नाव ‘बसेरा’ आहे. या बंगल्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Photo Source: @legendaryrekha/instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख