-
‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने अवघ्या १९ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती.
-
तिला एका म्युझिक व्हिडीओतून प्रचंड लोकप्रियता मिळाली.
-
१९ व्या वर्षी तिला एका गाण्याने देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली.
-
‘कांटा लगा’ या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं.
-
तिला एक सिनेमा मिळाला ज्यात तिने अक्षय कुमार, सलमान खानबरोबर कामही केलं. पण नंतर मात्र तिचं करिअर फारसं चमकलं नाही.
-
करिअरमध्ये अनेक रिअॅलिटी शो करणारी शेफाली आता ४१ वर्षांची आहे.
-
ती अखेरची २०१९ मध्ये ‘बिग बॉस १३’ मध्ये झळकली होती.
-
शेफाली जरीवालाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं.
-
लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
-
शेफाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
शेफालीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, या मुलाखतीत ती आई होऊ शकत नसल्याचं तिने सांगितलं.
-
पारस छाबराच्या शोमध्ये शेफाली जरीवालाला बाळाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “मूल जन्माला कुणीली घालू शकतं, पण मला वाटतं की जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना घराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे.”
-
“प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो, पण जो दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात आणतो आणि त्याचे पालनपोषण करतो तो सर्वात महान आहे,” असं शेफाली जरीवाला म्हणाली.
-
“वयाच्या १२-१३ व्या वर्षी जेव्हा मला मूल दत्तक घेणं ही गोष्ट समजली तेव्हापासूनच माझ्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता,” असंही तिने नमूद केलं.
-
शेफाली जरीवाला पुढे म्हणाली, “बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयात तुम्हाला पती व तुमच्या कुटुंबियांचाही पूर्ण पाठिंबा असावा लागतो. आमच्या घरात मूल दत्तक घ्यायला सगळे तयार आहेत, पण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी लांब असते की त्या काळात मुलं मोठी होतात.”
-
“पराग आणि मी खूप दिवसांपासून मूल दत्तक घेण्याचा विचार करत होतो, पण ते शक्य होत नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात खूप अंतर आहे,” असं शेफाली म्हणाली.
-
बाळाच्या नियोजनाबाबत शेफाली म्हणाली, “माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.”
-
“आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत. आता वाटतं की जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हाच आमच्या घरी नवीन पाहुणा येईल,” असं शेफाली म्हणाली.
-
यानंतर पारसने तिला मुलगा हवा की मुलगी याबाबत विचारलं.
-
त्यावर शेफालीने सांगितलं की तिला व पती परागला मुलगी हवी आहे.
-
पण जे नशीबात असेल तेच होईल, असं तिने म्हटलं.
-
शेफाली ४१ वर्षांची असून तिचा पती पराग ४८ वर्षांचा आहे.
-
पराग त्यागी लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
(सर्व फोटो – शेफाली जरीवाला व पराग त्यागी इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…