-
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणला मॉडेल म्हणून तिच्या पहिल्या असाइनमेंटसाठी 2000 रुपये मिळाले. (फोटो स्रोत: @deepikapadukone/instagram) -
पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी जेव्हा पहिल्यांदा टीव्ही शोमध्ये दिसला तेव्हा त्याला 1700 रुपये मानधन मिळाले. (फोटो स्रोत: @pankajtripathi/instagram) -
अमिताभ बच्चन
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी कोलकाता येथील बर्ड अँड कंपनीमध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते. येथे बिग बींना 1640 रुपये पगार मिळत होता. (फोटो स्रोत: @amitabhbachchan/instagram) -
आमिर खान
आमिर खानला त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ मध्ये मुख्य नायकाची भूमिका करण्यासाठी दरमहा फक्त 1,000 रुपये मानधन मिळत असे. (फोटो स्रोत: @amirkhanactor_/instagram) -
अक्षय कुमार
एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करताना अक्षय कुमारला पहिला पगार मिळाला, तो 150 रुपये होता. (फोटो स्रोत: @akshaykumar/instagram) -
हृतिक रोशन
हृतिक रोशनने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तो पहिल्यांदा ‘आशा’ चित्रपटात जितेंद्रसोबत डान्स नंबर करताना दिसला होता. यासाठी त्याला 100 रुपये मानधन मिळाले होते. त्यावेळी त्याचे वय 6 वर्षे होते. (फोटो स्रोत: @hrithikroshan/instagram) -
सलमान खान
सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची पहिली नोकरी बॅकग्राउंड डान्सरची होती आणि त्यासाठी त्याला ७५ रुपये मिळायचे. (फोटो स्रोत: @beingsalmankhan/instagram) -
शाहरुख खान
शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमध्ये जेव्हा त्याने खुर्चीची व्यवस्था करण्याचं काम केले तेव्हा त्याला 50 रुपये पहिला पगार म्हणून मिळाले. (फोटो स्रोत: @shahrukh__khan__fanclub/instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”