-
बॉलीवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन यांनी अमिताभ यांच्या नावासोबत स्वतःचे नाव जोडण्यावर आक्षेप व्यक्त केला होता. जया बच्चन यांनी अध्यक्ष जगदीप धनखर यांना सांगितले की, ”मी एक कलाकार आहे, देहबोली आणि चेहऱ्यावरील भाव समजते. यानंतर त्या म्हणाल्या की ”सर मला माफ करा, पण तुमची बोलण्याची पद्धत बरोबर नाही.”
-
जया बच्चन अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एकदा खुद्द अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे माफी मागावी लागली होती. जाणून घेऊया याबाबत.
-
एकदा जया बच्चन आपल्या सून ऐश्वर्या रायबाबत पापाराझींवर चिडल्या होत्या. ऐश्वर्या एका कार्यक्रमातून परतत असताना फोटोग्राफरने ऐश्वर्या रायला ऐश अशी हाक मारली, त्यावर जया बच्चन चिडल्या आणि त्या फोटोग्राफरला ओरडल्या आणि त्यांनी विचारले की ”ती तुमच्या वर्गात शिकते का”?
-
जय बच्चनला अनेकवेळा आपल्या चाहत्यांवरही चिडल्या आहेत. एकदा त्यांच्या एका चाहत्याने त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्यावर त्या खूप चिडल्या आणि त्याला फटकारत त्याला विचारले की ”फोटो काढण्यापूर्वी तू माझी परवानगी घेतली होतीस का? जरा काही शिष्टाचार शिका”.
-
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एकदा जया बच्चन यांनी फोटोग्राफरला जंगली असेही म्हटले होते. प्रकरण वाढत असल्याचे पाहून अभिषेक बच्चनने जया बच्चन यांना शांत केले.
-
2008 मध्ये ‘द्रोण’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक गोल्डी बहल स्टेजवर इंग्रजीत बोलत होते. त्यांच्यानंतर जया बच्चन यांची वेळ आली तेव्हा त्या माईक पकडताच म्हणाल्या, ‘आम्ही यूपीचे आहोत, म्हणून हिंदीत बोलू, महाराष्ट्राचे लोकं, माफ करा’.
-
त्यांची ही गोष्ट महाराष्ट्रातील काही नेत्यांना आवडली नाही, त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्याच वेळी, अमिताभ बच्चन यांचा ‘द लास्ट लायर’ चित्रपट थिएटरमध्ये चालू होता. जया बच्चन यांच्या या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत अभिनेत्री माफी मागत नाही तोपर्यंत अमिताभ बच्चन यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.
-
जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या ‘द लास्ट लिअर’ या चित्रपटावर बहिष्कार टाकला जाऊ लागला आणि चित्रपटगृहांची तोडफोड सुरू झाली. जया बच्चन यांनी माफी न मागण्याचे निर्णय घेतले. अशा स्थितीत वाद वाढत असल्याचे पाहून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वतीने माफी मागितली होती.
-
(सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख