-
Actress Hedy Lamarr Invented Wi-Fi : वाय-फाय या डिजिटल जगाचा अविभाज्य भाग बनले आहे. वाय-फायमुळे आपल्याला वायरशिवाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते. मात्र, वाय-फायचा शोध एका हॉलीवूड अभिनेत्रीने लावला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
-
वाय-फायचा शोध लावणाऱ्या अभिनेत्रीचे नाव हेडी लमार आहे. ती ऑस्ट्रियन-अमेरिकन अभिनेत्री होती. १९४० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि हॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने लोकांची मनं जिंकली.
-
‘कॉम्रेड एक्स’, ‘अल्जीयर्स’, ‘व्हाइट कार्गो’, ‘द स्ट्रेंज वुमन’, ‘माय फेव्हरेट स्पाय’ व ‘सॅमसन अँड डेलीलाह’ सारख्या दमदार चित्रपटात दिसलेल्या हेडी लमारबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
-
एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त, हेडी एक गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि संशोधक होती. तिने शोधलेल्या तंत्रज्ञानांपैकी एकाने जीपीएस, ब्लूटूथ आणि वाय-फाय यासह भविष्यातील कम्युनिकेशन सिस्टमचा पाया रचला.
-
या अभिनेत्रीने दुसऱ्या महायुद्धात वाय-फायचा शोध लावला होता. हे युद्ध संपवण्यात मदत करण्यासाठी तिने हा शोध लावला होता. मात्र, नौदलाने युद्धकाळात हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास नकार दिला होता.
-
मग तिने हॉलीवूडचे संगीतकार जॉर्ज अँथेल यांच्यासह ‘फ्रिक्वेंसी हॉपिंग’ टेक्निकवर काम केलं, जे आज वायरलेस कम्युनिकेशन्सच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकास म्हणून ओळखले जाते.
-
लमार व अँथिल यांनी १९४२ मध्ये त्यांच्या शोधाचे पेटंट घेतले, परंतु ते १९८१ पर्यंतच क्लासिफाइड केले गेले. त्या काळात ते फक्त सोलार किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशनसारख्या लष्करी तंत्रज्ञानामध्ये वापरले जात होते.
-
फ्रिक्वेन्सी हॉपिंग व्यतिरिक्त हेडी लमारने इतरही अनेक शोध लावले.
-
वाय-फाय हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे जे रेडिओ लहरींचा वापर करून डिव्हाइसना इंटरनेट किंवा इतर नेटवर्कशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट करू देते. Wi-Fi चा फुल फॉर्म वायरलेस फिडेलिटी आहे.
(एपी फोटो)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड