-
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने एक आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये ती तिच्या नवीन कारसोबत दिसत आहे.
-
खुशीने नुकतीच लाल रंगाची नवीन मर्सिडीज बेंझ जी-४००डीची डिझेल कार खरेदी केली आहे.
-
या लक्झरी कारची किंमत २.५५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
-
या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यामध्ये रूफ रॅक आणि सिल्व्हर फिनिशसह १८ इंच व्हील आहेत.
-
खुशी कपूरच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ती पण जान्हवी कपूरप्रमाणे आता बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या वर्षी ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे खुशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
खुशीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच अभिनेत्री बॉलीवूडमधील दोन मोठे चित्रपट करणार असल्याचे बोलले जात आहे.
-
खुशी लवकरच धर्मा प्रोडक्शनचा ‘नादानियां’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
‘नादानियां’ या चित्रपटात खुशी सैफ अली खानच्या मूला म्हणजे इब्राहिम अली खानसोबत मध्ये दिसणार आहे.
-
लव्ह टुडे’च्या हिंदी रिमेकमध्ये खुशी जुनैद खानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. (सर्व फोटो: खुशी कपूर/इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल