-
मुंबईतील एका स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान स्टॅन्डअप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकीने वादग्रस्त वक्तव्य केले. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
मुनव्वरने (Munawar Faruqui) वापर केलेल्या शब्दप्रयोगामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान कोकणी माणसाविषयी उल्लेख करताना मुनव्वरने शिवीचा वापर केला. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
एका स्टँडअप कॉमेडीदरम्यान बोलताना “मुंबईतून सर्वजण आले आहेत ना?”, असं मुनव्वरने प्रेक्षकांना विचारलं. “कुणी लांबून प्रवास करुन आलं नाही ना?”, असा सवालही त्याने विचारला. यावेळी प्रेक्षकांमधील एकाने आपण तळोजा येथून आल्याचं सांगितलं. त्यावर मुन्नवर म्हणाला, “अच्छा, आज विचारलं प्रवास करुन आलात का? तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळं झालं. पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की, कुठे राहतात? तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोकं सर्वांना *** बनवतात”. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
दरम्यान, मुनव्वरच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राज्यातील अनेक नेत्यांनी मुनव्वरला धारेवर धरले आहे. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
मनसेने मुनव्वर जिथे दिसेल तिथे चोपा अशी थेट भूमिका घेतली आहे. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
याशिवाय शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडूनही त्याच्या विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
मागितली माफी
मुनव्वरने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कोकणी माणसाची जाहीर माफी मागितली आहे. मुनव्वर फारुकीने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo Source: Instagram/munawar.faruqui) -
“मी एक शो केला त्यामध्ये मी क्राऊड वर्क म्हणजेच लोकांशी संवाद साधत होतो. त्यात कोकणाचा विषय निघाला. तळोजामध्ये कोकणी लोक राहतात मला ठाऊक आहे. कारण माझे अनेक मित्र तिथे राहतात. मात्र जे बोललो ते जरा संदर्भ सोडून झालं. मी कोकणाची खिल्ली उडवली असं अनेकांना वाटलं. मात्र माझा तो हेतू मुळीच नव्हता. मी आत्ताही तेच सांगू इच्छितो की क्राऊड वर्कमध्ये मी बोलून गेलो. मात्र मी पाहिलं की लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कॉमेडियन आहे. माझं काम लोकांना हसवणं आहे दुखवणं नाही. त्यामुळे मी मनापासून जे दुखावले गेलेत त्यांची माफी मागतो. सॉरी माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. इंटरनेटवर जोक व्हायरल झाला आहे. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र” (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
-
दरम्यान मुनव्वरच्या माफीनंतर “फटके खाण्याआधी सरळ झाला. यापुढे मराठी माणूस, कोकणी माणूस किंवा हिंदूंबाबत काही बोललास तर थेट अॅक्शन होईल.”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणेंनी सोढाल मीडियावर दिली आहे. (Photo Source: Instagram/munawar.faruqui)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच