-
मराठी मनोरंजन विश्वातील वादग्रस्त मात्र तितकाच पाहिला जाणारा कार्यक्रम ‘बिगबॉस मराठी’चे पाचवे पर्व तुफान गाजत आहे.
-
या कार्यक्रमात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळेच कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढत आहे.
-
दरम्यान, या कार्यक्रमातील अरबाज पटेलने पहिल्या दिवसापासूनच सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. आज आपण अरबाजविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
-
‘बिगबॉस’च्या आधी अरबाज MTVच्या ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात तो इतर स्पर्धकांना चुरशीची टक्कर देताना दिसला.
-
या कार्यक्रमात तो नायरा आहुजासह कनेक्शनमध्ये होता. शो संपल्यानंतर नायरा अहुजानं अरबाजवर फसवल्याचा आरोप केला.
-
स्प्लिट्सविला या शोमध्ये येण्यापूर्वी तसेच त्यादरम्यान तो लीझा बिंद्राला डेट करत होता, असं नायरानं म्हटलं होतं. अरबाज आणि लीझा यांचे अनेक रोमॅन्टिक फोटो व्हिडिओही व्हायरल झाले होते.
-
यानंतर तो प्रेक्षकांच्या टीकेचा धनी ठरला. स्प्लिट्सविला या शोमध्ये स्पर्धक पार्टनर शोधण्यास येतात, पण आधीच गर्लफ्रेंड असताना तू या शोमध्ये आलाच का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला.
-
यावर स्पष्टीकरण देत तो म्हणाला होता की स्प्लिट्सव्हिलामध्ये असताना तो कोणालाही डेट करत नव्हता, मात्र शो संपल्यानंतर त्याला लीझामध्ये त्याची जीवनसाथी भेटली.
-
याच कारणामुळे तो शो संपल्यानंतर चर्चेत आला होता. आता अरबाज ‘बिगबॉस’ मराठीमध्ये पहिल्याच दिवसापासून आक्रमक खेळताना दिसत आहे.
-
त्यानंतर ती निकी तांबोळीसह फ्लर्ट करतानाही दिसला. त्यामुळेच आधी नायरा आणि आता निकीमुळे अरबाज पुन्हा एकदा चर्चेत आहे.
-
आता बिग बॉस मराठीच्या घरातही तो निक्कीसोबत प्रेमाचं नाटक करतोय? त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल निक्कीला कल्पना दिली आहे का? की खेळात पुढे जाण्यासाठी तो फक्त निक्कीचा वापर करतोय, अशी अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.
-
अरबाज मूळचा औरंगाबादचा आहे. तो एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर, मॉडेल आणि एक अभिनेता आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 1.8 दशलक्ष फॉलोअर्स असून तो 24 वर्षांचा आहे.
-
तो अनेक म्युझिक व्हिडिओंचाही भाग होता. अरबाज स्वतःचे वर्णन ‘आक्रमक, आकर्षक आणि मजबूत’ असे करतो. तसेच अरबाजने खुलासा केला की जिम, अभिनय आणि खाणे ही त्याची आवड आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”