-
लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ निगमने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे.
-
सिद्धार्थने टीव्ही मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सिद्धार्थने नवीन घर घेतलं आहे.
-
सिद्धार्थने नुकताच नवीन घरात गृहप्रवेश केला.
-
त्याने आई व मोठ्या भावाबरोबर घरात पूजा केली.
-
सिद्धार्थने पूजेचे फोटो शेअर करत घराची झलक दाखवली.
-
हे फोटो शेअर करताना सिद्धार्थ निगमनं लिहिलं की, “स्वप्नांचे शहर मुंबईमध्ये माझे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आम्ही नवीन घर घेतले आहे.”
-
“नवीन घरात आम्ही वास्तूशांती केली. तसेच कलश पूजा व रुद्राभिषेक केला.”
-
“ही अनेक वर्षांची मेहनत आहे. मला व माझ्या भावाला आईला असं हक्काचं घर द्यायचं होतं.” – सिद्धार्थ निगम
-
“तिला नवीन घरात फिरताना पाहून खूप छान वाटतंय. हे घर आमच्या संघर्षाचं प्रतीक आहे.” – सिद्धार्थ निगम
-
“सर्वांच्या आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद. ही स्वप्नाच्या शहरातील नवीन सुरुवात आहे,” असं सिद्धार्थने लिहिलं.
-
सिद्धार्थच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘बॉर्नव्हिटा’च्या जाहिरातीतून झाली. यानंतर सिद्धार्थने ‘धूम ३’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यात सिद्धार्थने आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटानंतर सिद्धार्थ निगमने अनेक हिट टीव्ही शो केले. त्याने ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेत दमदार अभिनय करून सर्वांची मने जिंकली.
-
सम्राट अशोकाची भूमिका साकारून तो लोकप्रिय झाला. याशिवाय सिद्धार्थ ‘अलादीन’ आणि ‘चंद्रनंदिनी’ यांसारख्या मालिकांमध्येही दिसला होता.
-
त्याने सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये काम केलं आहे. (फोटो – सिद्धार्थ निगम इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख