-
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश असलेला निखिल कामथ सध्या बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. निखिल आणि रिया मुंबईच्या रस्त्यावर बाईकवरुन फिरताना दिसले. यावेळी अभिनेत्रीने मास्क घातला होता. क्रॉप टॉप, डेनिम जीन्स आणि क्रॉप्ड डेनिम जॅकेटमध्ये रिया खूपच मस्त दिसत होती, तर निखिल कामथ ब्लॅक शॉर्ट्स आणि बॉम्बर जॅकेटमध्ये दिसत होता. (Rhea Chakraborty/FB)
-
फोर्ब्स २०२३ च्या अहवालानुसार, निखिल कामथ हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश आहे. तो झिरोधाचा संस्थापक आहे. निखिल कामतला एकेकाळी ८,००० रुपये प्रति महिना पगार होता आणि आता तो कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. चला त्याच्याबद्दल जाणून घेऊ. (Rhea Chakraborty/FB)
-
निखिल कामथ हा ब्रोकिंग फर्म Zerodha तसेच टू बीकन या कंपनीचे सह संस्थापक आहे. याशिवाय तो रिटेल स्टॉक ब्रोकरही आहे. (Nikhil Kamath/Insta)
-
कर्नाटकातील शिमोगा येथे जन्मलेल्या निखिल कामथने फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने आपले शिक्षण सोडले. कंपनी सुरू करण्यापूर्वी निखिल कामथ एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या काळात त्याचा पगार फक्त ८,००० रुपये प्रति महिना होता. (Nikhil Kamath/Insta)
-
निखिल कामथने त्याचा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्सची सुरुवात केली. याद्वारे तो शेअर बाजारातील व्यवहाराशी संबंधित काम करत असे. (Nikhil Kamath/Insta)
-
२०१० मध्ये निखिल कामथने त्याचा भाऊ नितीन कामथ याच्यासोबत झिरोधा कंपनी सुरू केली. नोकराी करत असतानाच त्याच्या मनात स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचार आला होता. यानंतर त्याने शेअर ट्रेडिंगही सुरू केले. (Nikhil Kamath/Insta)
-
फोर्ब्सने २०२३ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय अब्जाधीशांची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये निखिल कामथचेही नाव पाहायला मिळाले होते. या यादीत तो सर्वात तरुण भारतीय अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला. (Nikhil Kamath/Insta)
-
एका अहवालानुसार, निखिल कामथला गेल्या वर्षी एकूण ७२ कोटी रुपये वार्षिक पगार मिळाला होता. अशा स्थितीत पाहिले तर तो एका महिन्यात ६ कोटी रुपये कमावतो. त्यानुसार तो दररोज २० लाख रुपये कमावतो. (Nikhil Kamath/Insta)
-
फोर्ब्स अब्जाधीशांच्या २०२४ यादीनुसार, निखिल कामथची एकूण संपत्ती ३.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. (Nikhil Kamath/Insta)

“माझ्या दोन्ही मुलांना हृदयविकार, उपचाराकरता आम्हाला भारतात राहू द्या”, पाकिस्तानी नागरिकाची भारताला विनंती!