-
१९ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील? दरवर्षीप्रमाणेच यंदाही सारा अली खानने पतौडी पॅलेसमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला.
-
यावेळी अभिनेत्री सोहा अली खान आणि करीना कपूर देखील उपस्थित होत्या. सर्वजण सुंदर पारंपरिक पेहरावात दिसून आले.
-
सारा पिवळ्या रंगाचा सूट परिधान करून रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आली होती, तर सोहाने लाल रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता. करीना गुलाबी कुर्ता सेटमध्ये दिसून आली.
-
साराने पिवळ्या रंगाच्या सूट घातला होता. साध्या गोल नेकलाइनच्या या सूटमध्ये गोटा पट्टी आणि पुढच्या बाजूला तारे असलेले डिझाइन आहे. यामध्ये लाल रंगाचा टचही देण्यात आला आहे.
-
सोहाने यावेळी लाल रंगाचा कफ्तान स्टाईल कुर्ता सेट घातला होता. या ड्रेसवर सोनेरी धाग्यांचे काम केले होते. व्ही नेकच्या या कुर्त्यावर सोहाने मॅचिंग पॅन्ट घातली होती.
-
सोहाने तिचा लूक अतिशय साधा ठेवला होता. मिडल पार्टीशन बनमध्ये बांधलेल्या केसांसह तिने मिनिमल मेकअप केला होता, तर कपाळावरील लाल बिंदीने तिचे रूप आणखीनच सुंदर बनवले.
-
करीना गुलाबी व्ही-नेकलाइन कुर्ता सेटमध्ये दिसली, तर सैफ आणि जेह निळ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसले. इब्राहिम अली खान पांढरा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसला.
-
सोहाची मुलगी इनायाने तिचे भाऊ तैमूर आणि जेह यांना राखी बांधण्यासोबतच त्यांच्या घरात त्यांची काळजी घेणाऱ्या सर्व लोकांना राखी बांधली.
-
सारा अली खानने यावेळी इब्राहीम, तैमुर आणि जेहला राखी बांधली.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही