-
कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी देशभरात संताप व्यक्त होत आहे. देशाच्या विविध भागात डॉक्टर काही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. बॉलीवूडच्या अनेक स्टार्सनीही याबाबत दु:ख व्यक्त करत सरकारकडून न्याय मागितला आहे. कोण काय बोलले ते जाणून घेऊ.
-
आयुष्मान खुराना
अभिनेता आयुष्मान खुरानाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवर कविता गाऊन आपली व्यथा मांडली असून तिला न्याय मिळावा, अशी विनंती सरकारकडे केली आहे. त्याच्या हिंदी कवितेचे शीर्षक आहे ‘काश! मैं भी लड़का होती’. (Ayushmann Khurrana/FB) -
आलिया भट्ट
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने लिहिले आहे की, “आणखी एक असा दिवस निघाला आहे ज्याने जाणीव करुन दिली की महिला कुठेही सुरक्षित नाहीत. ही हृदयद्रावक घटना आम्हाला आठवण करून देणारी आहे की एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे आणि तरीही काहीही बदललेले नाही.” महिलांच्या सुरक्षेकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन आलिया भट्टने केले आहे. (Alia Bhatt/FB) -
विजय वर्मा
अभिनेता विजय वर्माने प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर एक पोस्ट शेअर केली असून, “डॉक्टर सध्या काय करत आहेत याकडे लक्ष देण्यापेक्षा, महिला डॉक्टरबरोबर गैरकृत्य झाले आहे याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. असे म्हटले आहे. (Vijay Varma/FB) -
परिणीती चोप्राने म्हटले आहे की, “जर लोकांना कोलकाता बलात्कार प्रकरणाची बातमी वाचून त्रास होत असेल, तर कल्पना करा की त्या महिला डॉक्टरची कशी अवस्था झाली असेल. खूप घृणास्पद.” आरोपींना फाशी देण्याची मागणी परिणितीने केली आहे. (Parineeti Chopra/FB)
-
रिचा चढ्ढा
रिचा चढ्ढाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे योग्य तपासाची मागणी केली असून, सध्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान असणाऱ्या देशातील एकमेव महिला असल्याची आठवणही त्यांना करून दिली आहे. (Richa Chadha/FB) -
हृतिक रोशन
अभिनेता हृतिक रोशन म्हणाला, “एक समाज म्हणून नक्कीच आपल्याला प्रगती करायची आहे. एका असा समाज घडवायचा आहे जिथे आपण सगळे माणूस म्हणून समान पातळीवर सुरक्षित असू. आपल्याला याची सुरुवात स्वतःच्या मुलांपासूनच करावी लागेल. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आरोपींना कठोर शिक्षा दिली गेली तर अशा घटना करण्यासाठी लोक धजावणार नाहीत. या कठीण स्थितीमध्ये न्याय मागणाऱ्या पिडीतेच्या कुटुंबियांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत, मी या परिवारासोबत उभा आहे.” (Hrithik Roshan/FB) -
अर्जुन कपूर
रक्षाबंधनाच्या दिवशी अर्जुन कपूरने एक व्हिडिओ शेअर करून पीडितेसाठी न्यायाची मागणी केली आहे. “आपल्या सर्व बहिणींना भावाशिवाय फिरता यावे, असे ‘पुरेसे सुरक्षित’ वातावरण कसे निर्माण करता येईल?, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. (Arjun Kapoor/FB) -
फरहान अख्तर
फरहान अख्तरने एका कवितेतून न्यायाची मागणी केली आहे. (Farhan Akhtar/FB) -
रितेश देशमुख
आपण कोणत्या प्रकारच्या जगात वावरतोय? असं रितेश देशमुखने म्हटलं आहे. ही सैतान वृत्ती आपल्या आजूबाजूला लपलेली आहेत आणि आपण त्यांना ओळखू शकत नाही. त्यांना आपल्या देशाच्या कायद्याची भीती वाटत नाही. या बदमाशांना पकडून जाहीर फाशी देण्याची गरज आहे. या बदमाशांना देखील त्याच वेदना झाल्या पाहिजेत. या देशात प्रत्येक मुलगी, बहीण आणि आई सुरक्षित आहे, असे दाखवून दिले पाहिजे. अभिनेत्याने प्रचंड दुख झाले असल्याचे सांगितले आहे. (Riteish Deshmukh/FB -
या स्टार्सशिवाय सोनाक्षी सिन्हा, कंगना रणौत आणि स्वरा भास्कर यांसारख्या अनेक कलाकारांनी न्यायाची मागणी केली आहे. (Sonakshi Sinha/FB) ( हेही वाचा- अभिषेक बच्चनला त्याची आई जयाबद्दल या गोष्टींचा तिरस्कार आहे, त्याला कोणाची जास्त भीती वाटते ते सांगितले )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”