-
अनन्या पांडे सध्या तिच्या ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान, अभिनेत्री अतिशय स्टायलिश पोशाख परिधान करून आली होती. (Ananya Panday/Insta)
-
अभिनेत्रीने तिच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. (Ananya Panday/Insta)
-
अनन्या पांडेची ‘कॉल मी बे’ ही पहिलीचं वेब सीरिज आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान, अनन्या पांडेसह चित्रपटाची उर्वरित स्टार कास्ट देखील उपस्थित होती. शिवाय निर्माता करण जोहर देखील आला होता. (Ananya Panday/Insta)
-
अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती व्हाइट कलरच्या टॉपमध्ये दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने हार्ट प्रिंटेड पॅन्ट घातली आहे. ती या फोटोमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. (Ananya Panday/Insta)
-
अनन्या पांडेने टॉप आणि प्रिंटेड पँटसोबत हाय हिल्स परिधान केल्या आहेत. ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (Ananya Panday/Insta)
-
या आउटफिटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनेक किलर पोज देताना दिसली. (Ananya Panday/Insta)
-
अनन्याच्या हाय हिल्सबद्दल लोक सोशल मीडियावर विविध कमेंट करत आहेत. दरम्यान, ट्रेलर लाँचच्या वेळी ती खुर्चीवर बसली तेव्हा या हिल्सच्या टाचांच्या मागच्या बाजूला असलेले स्टिकर कॅमेऱ्यात कैद झाले. ज्यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Ananya Panday/Insta)
-
अनन्या पांडेची ही वेब सिरीज यावर्षी ६ सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज केली जाणार आहे. (Ananya Panday/Insta)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”