-
‘ओळख’, ‘का रे दुरावा’, ‘एक घर मंतरलेलं’ अशा मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली.
-
अभिनेता पियुष रानडेबरोबर मोठ्या थाटामाटात सुरूचीने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
-
सुरूची व पियुषच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सध्या दोघं लग्नानंतरचे पहिले सण एकत्र साजरे करताना दिसत आहेत.
-
नुकतीच सुरूचीची लग्नानंतरची पहिली मंगळागौर पार पडली. यावेळी पियुषी देखील तिच्या बरोबर होता.
-
सुरूचीने मंगळागौर कार्यक्रमाच्या सर्वात आधी अन्नपूर्णा मातेची पूजा केली. अत्यंत साध्या पद्धतीने घराच्या घरीच सुरूचीची पहिली मंगळागौर झाली.
-
मंगळागौरसाठी सुरूचीने खास पारंपरिक लूक केला होता. तिच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
गुलाबी साडी, नाकात नथ, बाजूबंद, गळ्यात सुंदर मंगळसूत्र, केसात गजरा, कपाळावर टिकली अशा पारंपरिक लूकमध्ये सुरूची दिसली.
-
सुरूचीच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – सुरूची अडारकर इन्स्टाग्राम
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल