-
अनेकदा शाहरुख खान आणि गौरी खान यांचा धाकटा मुलगा अबराम खान याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
मीडिया रीपोर्टसनुसार, अबराम मुंबईतील सर्वात महागड्या शाळेत शिकतो जाणून घेऊया या शाळेबद्दल.
-
मुंबईत अनेक शाळा आहेत पण धीरूभाई अंबानी शाळा सर्वात अव्वल असण्याचे सांगितले जाते. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी २००३ साली केली होती.
-
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचे मुलं शिक्षण घेतात.
-
शाहरुख खानचा मुलगा अबराम खानही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. ही शाळा वांद्रे येथील बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये आहे. या शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षणाची सोय आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि मोठा मुलगा आर्यन खान यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतलं आहे.
-
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी बालवाडीसाठी १४ लाख रुपये ते १२ वीच्या वर्गासाठी २० लाख रुपये आहे. या शुल्कामध्ये पुस्तके, स्टेशनरी, गणवेश आणि वाहतूक यासारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश होतो.
-
एलकेजी ते इयत्ता ७ वी साठी वार्षिक फी १,७०,००० रुपये आहे, ८ ते १० वी पर्यंतची फी ५,९०,००० रुपये आहे. आणि इयत्ता ११ वी आणि १२ वीची फी ९,९५५,००० रुपये आहे.
-
या शाळेत मुलांना अनेक सुविधा मिळतात. १ लाख ३० हजार स्क्वेअर फुटांमध्ये असलेल्या या शाळेत खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, एसी क्लासरूम, रूफटॉप गार्डन आणि टेनिस कोर्ट आहे.
-
सारा अली खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, अनन्या पांडे आणि न्यासा देवगन यांनी देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य