-
नववधू मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.
-
मंगळागौरीच्या (Mangalagauri 2024) कार्यक्रमातील काही खास फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
श्रावण (Shravan) महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते.
-
मंगळागौरीसाठी अमृताने फिकट जांभळ्या रंगाची नऊवारी साडी (Light Purple Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीवर अमृताने आरी वर्क केलेला ब्लाऊज (Aari Work Designer Blouse) परिधान केला आहे.
-
अमृताची ही साडी आणि ब्लाऊज ऋतुजा केळकरने डिझाईन केला आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर अमृताने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
अमृताचा पती अभिनेता प्रसाद जवादेने (Prasad Jawade) क्रिम रंगाचा बाराबंदी कुर्ता परिधान केला आहे.
-
‘नटुन थटून साजरी केली मंगळागौर.. प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और.. ज्याच्यासाठी हे व्रत केले..त्याची सगळ्या सोहळ्यात इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो..’ असे कॅप्शन अमृताने मंगळागौरीच्या फोटोंना दिले आहे.
-
अमृताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘अगं कित्ती गोड दिसतेय…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…