-
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या आवाजाने श्रोते नेहमीच घायाळ होतात.
-
सबंध जगभर त्यांचे चाहते आहेत, महेश त्यांच्या आवाजामुळे प्रचंड लोकप्रिय आहेत.
-
शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी पाहायला मिळते.
-
दरम्यान, गायक महेश काळे यांना ‘असोसिएशन ऑफ इंडो अमेरिकन्स’ या संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
-
७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारताचे महावाणिज्यदूत सिकर रेड्डी यांच्या हस्ते महेश काळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
-
‘असोसिएशन ऑफ इंडो अमेरिकन्स’ संस्थेने दिलेल्या या पुरस्काराबद्दल गायक महेश काळेंनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-
“एखाद्या क्षेत्रात तुम्ही केलेले भरीव कार्य आणि त्या क्षेत्रातील तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध होते तेव्हा तुम्हाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते, भारतीय शास्त्रीय संगीतात माझ्या वयाचे कलाकार स्वत:ला विद्यार्थी मानूनच पुढची वाटचाल करतात. अजून मला बराच मोठा टप्पा या क्षेत्रात गाठायचा आहे. शास्त्रीय संगीतात एक ठोस कार्य करायचे आहे, अभिजात संगीताचा मौलिक ठेवा निर्माण करायचा असून अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुरांनी आसमंत उजळून टाकायचा आहे’”, अशी भावना महेश काळे यांनी व्यक्त केली.
-
(सर्व फोटो महेश काळे फेसबुक पेजवरून साभार)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती