-
‘शका लाका बूम बूम’ या टीव्ही शोमधला संजू आठवतोय का? संजूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव किंशुक वैद्य आहे. किंशुक आता खूप मोठा आणि देखणा झाला आहे. त्याने आता आपला जोडीदारही निवडला आहे.
-
किंशुकने सोशल मीडियावर चाहत्यांसह एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. किंशुक आता वैवाहिक आयुष्य सुरू करणार आहे.
-
लग्नासाठी या जोडप्याने निळ्या रंगाचा मॅचिंग पोशाख परिधान केला होता. किंशुक कुर्ता पायजमामध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि संजूची होणारी पत्नी निळ्या साडीमध्ये खूप सुरेख दिसत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
-
दरम्यान, या 33 वर्षीय किंशुकने त्याची गर्लफ्रेंड आणि कोरिओग्राफर दीक्षा नागपालसोबत एंगेजमेंट केली आहे. हे जोडपे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
दीक्षा नागपाल टीव्ही, ओटीटीमध्ये तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. तिने ‘पंचायत सीझन 2’ चे आयटम साँग कोरिओग्राफ केले होते. दीक्षाने ‘शिवशक्ती’ या टीव्ही शोमध्ये कोरिओग्राफीची जबाबदारीही घेतली होती.
-
दीक्षाने तिच्या होणारा पती किंशुकचा म्युझिक व्हिडिओ चन्ना वे ची कोरिओग्राफी देखील केली आहे. दीक्षाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून असे दिसून येते की तिला साधे जीवन जगणे आवडते.
-
किंशुक वैद्य बद्दल बोलायचे झाले तर, ‘शका लाका बूम बूम’ व्यतिरिक्त त्याने ‘कर्णसंगिनी’, ‘वो तो है अलबेला’, ‘जात ना पूछे प्रेम की’, ‘राधाकृष्ण’, ‘वो अपना सा’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय ‘एक रिश्ता साझेदारी का’ सारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे.
(Photo Source: @kinshukvaidya54/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”