-
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आपला भाऊ सिद्धार्थच्या लग्नाआधीच्या विधींसाठी भारतात दाखल झाली आहे.
-
चोप्रा कुटुंबीयांच्या घरी सध्या सिद्धार्थच्या लग्नाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मजंठा रंगाच्या शिफॉन साडीत प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिच्या ग्लॅमरस लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रियांकाची साडी मनिष मल्होत्राने डिझाईन केली आहे.
-
या साडीवर देसी गर्लने हटके ज्वेलरी घातली होती.
-
Bulgari Website ने दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाच्या हातातील ब्रेसलेटची किंमत तब्बल ३० लाख ७९ हजार एवढी आहे.
-
तर, प्रियांकाने गळ्यात घातलेल्या मोत्यांच्या नेकलेसची किंमत तब्बल ८ कोटी रुपये आहे.
-
प्रियांकाने या शिफॉन साडीतील सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम )
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”