-
शिक्षण आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा घटक असतो. शिक्षणाने केवळ आपल्यातचं सुधारणा होते असे नाही तर त्याचा फायदा आपल्याला सामाजिक जीवन जगताना होत असतो. एक चांगला समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी शिक्षित असणे आवश्यक असल्याचे मानले जाते. आज आपण दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणाऱ्या आणि सबंध भारतभर प्रसिद्ध असलेल्या काही नायिकांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल माहिती घेऊयात.
नयनतारा
प्रचंड लोकप्रिय असलेली अभिनेत्री नयनतारा ही पदवीधर आहे. तिने केरळमधील तिरुवल्ला येथे असलेल्या मार्थोमा कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात कला शाखेची पदवी घेतली आहे. -
समांथा
समांथा रुथ प्रभुने तिचे शालेय शिक्षण चेन्नई येथील होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूलमधून पूर्ण केले आणि नंतर तिने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. -
अनुष्का शेट्टी
अनुष्का शेट्टीने बंगलोरच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (बीसीए) पदवी घेतली आहे. -
त्रिशा
त्रिशाने तिचे शालेय शिक्षण चेन्नई येथील सेक्रेड हार्ट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर चेन्नईच्या इथिराज कॉलेज फॉर वुमनमधून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) ही पदवी घेतली. -
रश्मिका
रश्मिका मंदान्नाने एम.एस. रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, बंगलोर या कॉलेजमधून मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यातील कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. -
श्रुती हासन
श्रुती हासन चेन्नईच्या लेडी अँडल स्कूलमध्ये शिकली आणि नंतर मुंबईतील सेंट अँड्र्यू कॉलेजमध्ये तिने मानसशास्त्रात पदवी घेतली. संगीताचा अभ्यास करण्यासाठी तिने कॅलिफोर्नियातील संगीत संस्थेतही प्रवेश घेतला. -
साई पल्लवी
साई पल्लवीने जॉर्जियामधील तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस (Bachelor of Medicine, Bachelor of Surgery) पदवी पूर्ण केली. ती एक प्रशिक्षित नृत्यांगना देखील आहे. -
कीर्ती सुरेश
कीर्ती सुरेशने तिचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय पट्टम, तिरुवनंतपुरम येथे पूर्ण केले आणि पर्ल अकादमी चेन्नई येथून फॅशन डिझाईनमध्ये पदवी घेतली. -
तमन्ना
तमन्नाने तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या मानेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये पूर्ण केले आणि नंतर नॅशनल कॉलेज मुंबई येथून कला शाखेत पदवी घेतली. -
काजल अग्रवाल
काजल अग्रवालने मुंबईतील केसी कॉलेजमधून जाहिरात आणि विपणन या स्पेशलायझेशनसह बॅचलर ऑफ मास मीडिया पदवी घेतली आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ