-
बॉलीवूडमधील भीषण सत्य जे अनेकदा पडद्याआड दडलेलेच राहते. यावर अनेक अभिनेत्री उघडपणे बोलल्या आहेत. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री वरतून कितीही चमकदार वाटत असली तरी आतमध्ये एक मोठी डार्क सिक्रेट्सची बाजूही तिला आहे. अनेक अशा गोष्टी ज्या नेहमी पडद्याआड राहतात त्यातील काही गुपितं खुद्द सेलिब्रिटींनीच उघड केली आहेत. होय, कंगना राणौत, तापसी पन्नू, राधिका आपटे आणि नोरा फतेही यांसारख्या अभिनेत्रींसह अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सत्य बोलण्याचे आणि बॉलीवूडची काळी बाजू उघड करण्याचे धाडस केले आहे. याबद्दल जाणून घेऊयात.
-
कंगना रणौत
अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे प्रसिद्धीत असते. -
अभिनेत्रीने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवर तोंडसुख घेतले आहे. अभिनेत्री म्हणाली की बॉलीवूडचे लोक फक्त स्वतःमध्ये आणि स्वतःच्या मस्तीत हरवले आहेत. जे लोक पार्ट्यांना जातील त्यांनाच काम मिळते.”
-
तापसी पन्नू
तापसी पन्नूने एकदा सांगितले होते की निर्मात्यांना आर्थिक समस्या असल्यामुळे तिला चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले होते. -
तसेच अनेक अभिनेत्यांनीही तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता कारण ती ‘ए-लिस्ट अभिनेत्री’ नव्हती.
-
राधिका आपटे
राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा ती बॉलिवूडमध्ये नवीन होती, तेव्हा तिला तिच्या शरीरावर काम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. -
पहिल्या भेटीत कुणीतरी तिला नाकाची शस्त्रक्रिया करायला सांगितली तर कुणी चेहऱ्याची आणि पायांची शस्त्रक्रिया करायला सांगितली. एवढेच नाही तर तिला ब्रेस्ट इम्प्लांट करून घेण्यासही सांगण्यात आले होते.
-
नोरा फतेही
नोरा फतेहीने एका पॉडकास्टमध्ये फिल्म इंडस्ट्रीत तिला येणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल सांगितले होते. नोराने सांगितले की, कधीकधी तिला अशा लोकांचा सामना करावा लागतो ज्यामुळे तिला विचित्र वाटते. “त्यांच्या बोलण्यातून कळते की लोकांचा हेतू चांगला नाही.”, असे तिने म्हंटले होते. -
ईशा गुप्ता
ईशा गुप्ताने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला नाकाची शस्त्रक्रिया करण्याचा आणि गोरा रंग येण्यासाठी इंजेक्शन घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. -
प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की, त्यावेळी ते सर्व ऐकून ती त्या सल्ल्यांना ऐकण्याच्या तयारीत होती, पण इंजेक्शनची किंमत ऐकून ती थक्क झाली आणि आजपर्यंत तिने असे काहीही केले नाही. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच