-
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.
-
भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात.
-
लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.
-
मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या अभिरुचीचा मान ठेवत नेहमीच दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत.
-
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२४ (Star Pravah Ganeshotsav 2024) या गणपती विशेष कार्यक्रमातून यंदा उलगडणार आहे खजिना बाप्पाच्या गोष्टींचा (Khajina Bappachya Goshtincha).
-
कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या बाप्पाच्या गोष्टी स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४ (Ganeshotsav 2024) कार्यक्रमातून नृत्यनाटिकेच्या रुपात आपल्यासमोर उलगडतील.
-
स्टार प्रवाह परिवारातले जवळपास १०० कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून गणरायाचा उत्सव साजरा करणार आहेत.
-
या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील मानसी आणि तेजस म्हणजेच समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे यांनी.
-
तर सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी देखिल आपल्या खुमासदार सादरीकरणाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे.
-
स्टार प्रवाहचा धिंगाणेबाज कलाकार अर्थातच सिद्धार्थ जाधवने देखिल कलाकारांसोबत धिंगाणा घालत जल्लोष केला आहे.
-
हा कार्यक्रम प्रेक्षकांना रविवार, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य