-
चार वर्षांनंतर अभिनेत्री मृणाल दुसानिस छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
-
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत मृणाल दुसानिस झळकणार आहे.
-
लवकरच मृणाल दुसानिसची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
मृणालच्या नव्या मालिकेची घोषणा १ सप्टेंबरला ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ या कार्यक्रमात होणार आहे.
-
पण ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत मृणाल व्यतिरिक्त कोण कलाकार झळकणार? जाणून घ्या…
-
‘ठिपक्यांची रांगोळी’मधून घराघरात पोहोचलेली अप्पू म्हणजे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर मृणालच्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
-
‘देवयानी’ मालिकेत एक्क्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विवेक सांगळे आता पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’च्या परिवारात सामील होत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत विवेक झळकणार आहेत.
-
तसंच काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका ‘पिंकीचा विजय असो’ मधील एक अभिनेता मृणालच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. हा अभिनेता म्हणजे विजय आंदळकर.
-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘काव्यांजली’ मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी आता ‘स्टार प्रवाह’च्या परिवारात सामील होत आहे. मृणालच्या नव्या मालिकेत कश्मिरा पाहायला मिळणार आहे.
-
याशिवाय ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील मोठी कार्तिकी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने मोठ्या कार्तिकीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. आता नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत अनुष्का दिसणार आहे.
-
दरम्यान, मृणालच्या नव्या मालिकेव्यतिरिक्त आणखी एक नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार आहे. या देखील मालिकेची घोषणा १ सप्टेंबरला ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ या कार्यक्रमात होणार आहे.
-
‘स्टार प्रवाह’वर या दोन नव्या मालिका सुरू झाल्यानंतर कोणत्या दोन जुन्या मालिका ऑफ एअर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम आणि इन्स्टाग्राम )
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल