-
Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra: अरबाज पटेल सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे.
-
अरबाज आणि निक्कीमध्ये प्रेम फुलतंय असं काही दिवसांपासून प्रेक्षकांना ‘बिग बॉस मराठी’ पाहून वाटत होतं.
-
या दोघांच्या नात्याबद्दल घरातील इतर सदस्यही गॉसिप करत होते.
-
दोघांच्या वागण्यावरून तसंच काहीसं दिसत होतं.
-
पण भाऊचा धक्कामध्ये आलेल्या दुर्गाने अरबाजला एक प्रश्न विचारला.
-
“सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय आणि याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही सिंगल आहात की कमिटेड?” यावर अरबाज जराही वेळ न घालवता ‘कमिटेड’ असं सांगतो.
-
अरबाजने निक्कीसाठी टोमॅटोचं हृदय बनवणं, पहिल्याच आठवड्यात घन:श्यामने तिला वहिनी हाक मारणं, अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडत निक्कीला कॅप्टन बनवणं, बीबी करन्सी वापरून निक्कीला सेफ करणं या गोष्टी पाहणारे प्रेक्षही अरबाजच्या उत्तराने गोंधळात पडले.
-
अरबाजने कमिटेड असल्याचं म्हटल्यावर त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
-
अरबाजच्या गर्लफ्रेंडचं नाव लीझा बिंद्रा आहे.
-
ती मॉडेल व कंटेंट क्रिएटर आहे.
-
तिचे इन्स्टाग्रामवर साडेसहा लाख फॉलोअर्स आहेत.
-
तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे व अरबाजचे अनेक रोमँटिक फोटो पाहायला मिळतात.
-
अरबाजनेही लीझाबरोबरचे फोटो त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले आहेत.
-
लीझा व अरबाज दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे.
-
आता लग्न केलं नसलं तरी लवकरच करणार असल्याचं अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं.
-
खरं तर अरबाजच्या रिलेशनशिपचा वाद हा Splitsvilla 15 पासून सुरू आहे. शोमध्ये अरबाजचं नायराबरोबर कनेक्शन होतं.
-
हा शो संपल्यावर त्याने खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली. यानंतर नायराने त्याच्यावर अनेक आरोप केले होते.
-
बिग बॉस शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी अरबाजने त्याच्या नात्याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता.
-
त्याने लीझा बिंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.
-
सध्या मी रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्याबरोबर मी सोशल मीडिया संदर्भातील कंटेट बनवायचो. – अरबाज पटेल
-
तिचं नाव लीझा आहे. आम्ही दोघंही एकत्र खूप छान दिसतो. आमची उंची सुद्धा एकमेकांना साजेशी अशी आहे. – अरबाज पटेल
-
अजून खूप आयुष्य बाकी आहे आणि बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. काहीजण म्हणतात माझं लग्न झालं आहे पण, असं नाहीये. – अरबाज पटेल
-
आपण सोशल मीडिया वापरतो. त्यामुळे माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात माझ्या चाहत्यांना रस असतो. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगेन. पण, सध्या माझं लग्न झालेलं नाही. – अरबाज पटेल
-
“लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद असेल, तर लवकरच लग्न करू. मी रिलेशनशिपमध्ये आहे पण, आमचं लग्न झालेलं नाही. लवकरच लग्न करू… सध्या मी करिअरकडे लक्ष देत आहे,” असं अरबाजने या मुलाखतीत सांगितलं होतं. (सर्व फोटो – अरबाज पटेल व लीझा बिंद्रा इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख