-
साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांना अक्षरशः देवा इतकच महत्त्व त्यांच्या चाहत्यांकडून दिले जाते.
-
काही अभिनेत्यांच्या तर देवासारख्या मंदिरांची निर्मितीही चाहत्यांकडून करण्यात आली असल्याचे वृत्त आपण वाचले असेल.
-
हे चाहते त्यांचे इतके दिवाने असतात की त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते काहीही करू शकतात. आज आपण ज्युनिअर एनटीआर या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत.
-
तसेच त्याच्या एका चाहत्याबद्दल झालेल्या एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, एनटीआरने चाहत्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ही खूप छान गोष्ट आहे. चला तर मग काय झालेलं ते जाणून घेऊ.
-
दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर काही वर्षांआधी एस एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटामध्ये झळकला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर एनटीआरची फॅन फॉलोविंग खूप वाढली.
-
जितके चाहते त्याला स्क्रीनवर बघण्यासाठी आतुर असतात तितकेच चाहते त्याला ऑफस्क्रीन बघण्यासाठी देखील प्रयत्न करत असतात.
-
आरआरआर नंतर अभिनेता ज्युनिअर एनटीआर यशाच्या शिखरावर पोहोचला. पडद्यावर विविध भूमिका साकारणारा हा अभिनेता त्याच्या रिअल लाईफमध्ये मात्र खूपच नम्र आहे.
-
माध्यमांमधील माहितीनुसार २०१३ मध्ये ज्युनिअर एनटीआरच्या ‘बादशाह’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमामध्ये त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
-
या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा जमाव जमल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत त्याच्या एका चाहत्याचा मृत्यू झाला.
-
चाहत्याच्या मृत्यूच्या घटनेचा ज्युनिअर एनटीआरवर खूप मोठा परिणाम झाला.
-
त्याने मृत चाहत्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली तसेच त्यांना आर्थिक मदत केली. त्याने कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देऊ केली. तसेच त्यांची जीवनभर काळजी घेण्याचे आश्वासन दिले.
-
त्यानंतर तब्बल आज ११ वर्षे झाली आहेत तरीही जुनिअर एनटीआर हा चाहत्याच्या कुटुंबाची काळजी घेतो.
-
एवढेच नाही तर अनेक अभिनेते गुप्त पद्धतीने लग्न करतात. किंवा लग्नामध्ये त्यांच्या चाहत्यांना कुठेही स्थान नसतं.
-
परंतु याबाबत अभिनेता ज्युनिअर एनटीआर वेगळा आहे.
-
त्याने त्याच्या लग्नामध्ये तब्बल १२,००० फॅन्सना निमंत्रण दिले होते.
-
त्याच्या लग्नामध्ये एकूण १५,००० लोकांनी हजेरी लावली होती.
-
दरम्यान २००४ मध्ये ‘आंद्रा’ नावाच्या त्याच्या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चदरम्यान दहा लाख फॅन्सनी हजेरी लावली होती.
-
इतकी मोठी गर्दी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.
-
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या गर्दीतील लोकांना घरी सुरक्षितरीत्या परत पाठवण्याकरिता रेल्वे प्रशासनाला विशेष नऊ ट्रेन चालवाव्या लागल्या होत्या.
-
दरम्यान, सध्या ज्युनिअर एनटीआरचा ‘देवारा भाग एक’ हा सिनेमा रिलीज होत आहे.
-
जबरदस्त ॲक्शनपट आणि ड्रामा असलेला हा सिनेमा २७ सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर आणि सेफ अली खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Photos Source: Jr NTR Facebbok)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख