-
बॉलीवूडचं स्टार जोडपं दीपिका पदुकोण व रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत.
-
सप्टेंबर महिन्यात घरी पाळणा हलणार असल्याचं दीपिकाने पोस्ट शेअर करत यापूर्वी सांगितलं होतं.
-
बाळाच्या आगमनाआधी रणवीर-दीपिकाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.
-
अभिनेत्रीने प्रेग्नन्सी दरम्यान पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉन्ट करत हटके फोटोशूट केलं आहे.
-
लवकरच आई होणारी दीपिका पदुकोण या सगळ्या फोटोंमध्ये बेबी बंपसह अतिशय ग्लॅमरस व बोल्ड दिसत आहे.
-
मॅटर्निटी फोटोशूटमध्ये रणवीरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
दीपिका व रणवीरने एकमेकांना अनेकवर्षे डेट केल्यावर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी खऱ्या अर्थाने फुलली.
-
आता लग्नाला ६ वर्षे पूर्ण होत असताना या स्टार जोडप्याच्या घरी नव्या बाळाचं आगमन होणार आहे.
-
सध्या या जोडप्याचं मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
नेटकऱ्यांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने या फोटोशूटवर “उफ नजर ना लगे” अशी कमेंट केली आहे.
-
बाळाचा जन्म झाल्यावर रणवीर-दीपिका वांद्रे येथील नव्या घरात शिफ्ट होणार आहेत.
-
आता दीपिका २०२५ पर्यंत कोणत्याही प्रोजेक्टवर काम करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. ( सर्व फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण व रणवीर सिंह इन्स्टाग्राम )
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख