-
समांथा रुथ प्रभू दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
अनेक संघर्षांना सामोरे जात समांथाने अभिनयाक्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. अनेकदा समांथाने स्वतःच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले आहे.
-
अभिनेत्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तिला दिवसातून एकदाच जेवण मिळायचं. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सामंथाने बारावीनंतर मॉडेलिंगची सुरुवात केली.
-
मॉडेलिंग करत तिने तिचे पुढील शिक्षण पूर्ण केले, मॉडेलिंगदरम्यान समांथाकडे जेवणासाठीही पैसे नव्हते मात्र आज ती कोट्यवधी संपत्तीची मालखीन आहे.
-
मॉडेलिंग करत समांथाने चित्रपटांसाठी ऑडिशन दिले. पुढे तिने ‘ये माया चेसावे’ चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता नागा चैतन्य देखील मुख्य भूमिकेत होता.
-
‘ये माया चेसावे’ या चित्रपटामुळे समांथा खूप प्रसिद्ध झाली. पुढे तिने महेश बाबू, सिद्धार्थ पवन कल्याण यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं.
-
अभिनयाक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर समांथाने कोट्यावधी संपत्ती कमावली. मीडिया रीपोर्टसनुसार समांथाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती १०१ कोटी रुपये आहे.
-
समांथा एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ५ कोटी रुपयांच मानधन घेते. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कोटींची कमाई करते.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर समांथा आता ओटीटीवरही पदार्पण करणार आहे.
-
लवकरच समांथा ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. समांथाने या वेब सीरिजसाठी तब्बल १० कोटींचे मानधन घेतले आहे.
-
‘सिटाडेल’ ही बहुचर्चित वेब सीरिज ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो: समांथा रुथ प्रभू/इन्स्टाग्राम)
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई