-
बॉलीवूडचा भाई दबंग सलमान खान हा त्याच्या चाहत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
-
सलमानच्या फिल्म्सवर त्याचे चाहते भरभरून प्रेम करतात.
-
त्याच्या चित्रपटांची फॅन्सना जबरदस्त उत्सुकता असते.
-
दरम्यान सलमान खान २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘टायगर थ्री’ या चित्रपटात दिसला होता.
-
सलमानच्या येणाऱ्या फिल्मसबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान आता एकावेळी तब्बल ६ चित्रपटांचे चित्रीकरण करत असल्याची माहिती माध्यमांमध्ये उपलब्ध झाली आहे.
-
सलमान सध्या ‘सिकंदर’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
-
तसेच सलमान ‘बेबी जॉन’ या वरूण धवनच्या चित्रपटात पाहुणा कलाकार असेल.
-
माध्यमांतील माहितीनुसार सलमान पुढील वर्षी ‘किक २’ या चित्रपटावर काम करणार आहे.
-
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार पुढच्याच वर्षी ‘द बुल’ या चित्रपटाचे शुटींगही सुरु होणार आहे. सलमान खान आणि करण जोहर या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
-
सनी देओलच्या ‘सफर’ या सिनेमातही सलमानचा एक कॅमिओ असणार आहे. तर ‘पठाण भाग दोन’ आणि ‘टायगर वर्सेस पठाण’ हे चित्रपट २०२७ मध्ये पाठोपाठ रिलीज होणार आहेत. (Photos Source: Instagram)
हेही वाचा: Photos : बॉलीवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्री केवळ अभिनयच करत नाहीत तर व्यवसायीक देखील आहेत, करतात करोडोंची कमाई

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”