-
सध्या अनन्या पांडे तिच्या आगामी वेब सीरिज ‘कॉल मी बे’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही वेब सीरिज ६ सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. पण रिलीजच्या ३ दिवस आधी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-
अलीकडेच अनन्याने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिचा पाळीव कुत्रा गमावल्याचे सांगितले आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचे बालपणीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
-
हे फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुझ्या आत्म्याला शांती मिळो फज, आय लव्ह यू फायटर. तुझ्यासोबतचे १६ वर्षांचे आयुष्य खूप सारा खाऊ आणि आनंदाने भरलेले होते, तुझी आठवण मला रोज येत राहिलं.”
-
अनन्याने तिच्या कुत्र्यासोबत १६ वर्षांचा मोठा काळ व्यतीत केल्याचे या कॅप्शनवरून दिसते. इतकी वर्षे तो अभिनेत्रीच्या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य होता.
-
अभिनेत्रीने फजचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनन्या फजसोबत दिसत आहे. अनन्या आणि फज दोघेही या चित्रात खूपच लहान दिसत आहेत.
-
एका फोटोमध्ये अनन्या तिची बहीण आणि आईसोबत आहे. फज अनन्याच्या आईच्या मांडीवर आहे.
-
एका फोटोमध्ये फज अनन्या आणि तिची बहीण यांच्यामध्ये झोपलेला दिसत आहे. अनन्याने फजचे असेच अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
ही छायाचित्रे पाहून हे स्पष्टपणे समजू शकते की अनन्याला तिचा पाळीव कुत्रा फज खूप आवडत होता. त्यांच्यातील नाते लहानपणापासूनच घट्ट होते. (Photo Source: @ananyapanday/instagram)
(हे देखील वाचा: Salman Khan Movies : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे येणाऱ्या वर्षात ‘हे’ चित्रपट होणार )

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही