-
Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad: महानायक अमिताभ बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता बच्चन व उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा कायम चर्चेत असते. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
नव्याला IIM Ahmedabad मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे.(फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
नव्याने नुकतीच या नवीन प्रवासाबद्दल माहिती दिली. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
नव्याने आयआयएम अहमदाबादच्या दोन वर्षांच्या ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी (BPGP) प्रवेश घेतला आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
“स्वप्नं खरी होतात. पुढील दोन वर्षे… उत्तम लोक आणि शिक्षकांबरोबर! Blended Post Graduate Programme (BPGP) Class of 2026,” असं कॅप्शन नव्याने या फोटोंना दिलं आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
तिच्या फोटोंमध्ये आयआयएम अहमदाबादचा कॅम्पस व तिचे नवीन मित्र-मैत्रिणी दिसत आहेत. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
नव्याने आयआयएम अहमदाबादच्या कॅम्पसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने यावर्षी दोन वर्षांचा नवीन ऑनलाइन एमबीए प्रोग्राम सुरू केला आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
हा कोर्स बिझनेस किंवा इतर काम करताना व्यग्र वेळापत्रक सांभाळून पुढील शिक्षण घेण्यास इच्छुक लोकांसाठी आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
हा ऑनलाइन एमबीएचा ‘ब्लेंडेड’ प्रोग्राम आहे ज्यात कॅम्पसमध्येही शिकवलं जातं. तसेच ऑनलाइन लाइव्ह व इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतात. म्हणजे ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने या कोर्समध्ये शिकवलं जातं. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे भारतातील टॉप मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल लोक अभिनंदन करत आहेत, तर नव्याला CAT मध्ये किती गुण मिळाले आहेत, असंही अनेकांनी विचारलं. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
CAT स्कोअर नसतानाही तुम्ही बीपीजीपी कोर्समध्ये प्रवेश घेता येतो. IIM अहमदाबादच्या एका प्राध्यापकाने एक्सवर लिहिलं की, नव्याचा सीव्ही खूप चांगला आहे आणि तिला बीपीजीपी कोर्ससाठी CAT ची गरज नाही. (फोटो – IIM अहमदाबाद फेसबूक)
-
आयआयएमए अहमदाबाद येथील बीपीजीपी मॅनेजमेंट कोर्समध्ये ब्लेंडेड किंवा हायब्रिड लर्निंगमध्ये क्लासरूम लर्निंग आणि लाइव्ह ऑनलाइन सेशन होतात. (फोटो – IIM अहमदाबाद फेसबूक)
-
ब्लेंडेड कोर्समध्ये २० टक्के किंवा त्याहून जास्त सेशन वर्गात होतात, बाकी ऑनलाइन शिकवलं जातं. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
-
बिझनेस टूडेच्या वृत्तानुसार, या कोर्सची एकूण फी २० लाख रुपये आहे. अर्ज फी, राहण्याचा खर्च आणि इतर खर्चाचा यात समावेश नाही. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा