-
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या अभिनेत्री आहेत ज्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या टॉप कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. आजकाल या अभिनेत्री बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतच्या चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री? (Photo: Nimrat Kaur/Instagram)
-
अभिनेत्री नेहा धुपियाने दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अँड मेरी कॉलेजमधून बीए, (इतिहास) पदवी घेतली आहे. (Photo: NEHA Dhupia/Facebook)
-
बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हुमा कुरेशीने दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून बी ए (इतिहास) ही पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
बॉलीवूड तसेच दक्षिण चित्रपटातील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आदिती राव हैदरीने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Aditi Rao Haidari/facebook)
-
सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या तृप्ती डिमरीने डीयूच्या श्री अरबिंदो कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Triptii Dimri/Instagram)
-
साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रिया सरननेही दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीने लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतली आहे. (Photo: Shriya Saran/facebook)
-
चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कोंकणा सेन शर्माने दिल्ली विद्यापीठाच्या टॉप कॉलेजपैकी एक असलेल्या सेंट स्टीफन कॉलेजमधून इंग्रजीमध्ये बीए केले आहे. (Photo: Konkona Sen sharma/Instagram)
-
मल्लिका शेरावतने दिल्ली विद्यापीठाशी संल्गनीत असलेल्या मिरांडा हाऊस या टॉप महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. (Photo: Mallika Sherawat/Instagram)
-
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अँड मेरी कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली आहे. (Photo: Rakul Preet/faccebook)
-
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या साक्षी तन्वरने छोट्या पडद्यावरही तिच्या दमदार अभिनयासमुळे वाहवा मिळवली आहे. अभिनेत्रीने लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतली आहे. (Photo: Sakshi Tanwar/Fan Page-Instagram)
-
निम्रत कौरने दिल्ली विद्यापीठ आणि नॉर्थ कॅम्पसच्या शीर्ष महाविद्यालयांपैकी एक असलेल्या श्रीराम ऑफ कॉमर्समधून बीकॉममध्ये पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Nimrat Kaur/Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख