-
IC ८१४: कंदहार हायजॅक
ही वेबसीरीज २४ डिसेंबर १९९९ रोजी झालेल्या आयसी ८१४ या विमान अपहरणावर आधारित आहे. या विमानाने काठमांडूहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केले होते परंतु मध्येच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले आणि अमृतसर नंतर लाहोर, तेथून दुबई आणि शेवटी अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले. (Photo: Netflix) -
IC ८१४: The Kandahar Hijack वेबसिरीज बाबत सध्या खूप गोंधळ सुरू आहे. दहशतवाद्यांच्या खऱ्या नावांऐवजी ‘भोला’ आणि ‘शंकर’ ही नावे चित्रपटात वापरण्यात आली आहेत. याबाबत गदारोळ सुरू आहे. दरम्यान, याआधी विमान अपहरणावर आधारित असलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. (Photo: Netflix)
-
जमीन
२००३ मध्ये रिलीज झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित जमीन हा चित्रपट देखील कंदहार हायजॅकवर आधारित होता. (Photo: Disney+ Hotstar) -
पायनम
२०११ मध्ये रिलीज झालेला साउथ चित्रपट पायनम देखील विमान अपहरणावर आधारित होता. या चित्रपटात साऊथचे स्टार नागार्जुन आणि प्रकाश राजसारखे स्टार्स दिसले होते. (Photo: Disney+ Hotstar) -
नीरजा
सोनम कपूर स्टारर नीरजा हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. १९८६ मध्ये मुंबईहून अमेरिकेला जाणारे ‘पॅन ॲम फ्लाइट ७३’ कराचीमध्ये दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. एअर होस्टेस नीरजा भानोटने प्रवाशांचे प्राण वाचवले होते, मात्र यासगळ्यात त्या स्वतः शहीद झाल्या होत्या. (Photo: Disney+ Hotstar) -
बेल बॉटम
अक्षय कुमार स्टारर बेल बॉटम चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट १९८० च्या दशकात खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात केलेल्या अपहरणाच्या घटनांवर आधारित होता. (Photo: Prime Video) -
IB७१
विद्युत जामवाल आणि अनुपम खेर स्टारर IB७१ हा १९७१ च्या इंडियन एअरलाइन्सच्या अपहरणावर आधारित आहे. (Photo: Disney+ Hotstar) -
चोर निकल के भागा
गेल्या वर्षी (२०२३) Netflix वर प्रदर्शित झालेल्या चोर निकल के भागा या चित्रपटाची कथा देखील विमान अपहरणावर आधारित होती. (Photo: Netflix) -
योद्धा
यावर्षी सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशि खन्ना स्टारर चित्रपट योद्धा प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतीय इतिहासातील विविध विमान अपहरणांवरून प्रेरित आहे, हा चित्रपट विशेषत: १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ८१४ वर भाष्य करतो. (Photo: Prime Video)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”