-
Navya Naveli Nanda Net Worth: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने आपल्या करिअरसाठी एक वेगळा मार्ग निवडला आहे.
-
तिचे आजी-आजोबा, मामा-मामी सिनेसृष्टीत आहे. तिच्या भावानेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
-
पण नव्याला मात्र सिनेक्षेत्रात फार रस नाही. ती नवउद्योजक आहे.
-
नव्याचे वडील निखिल नंदा हे उद्योगपती आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नव्याने करिअरसाठी हेच क्षेत्र निवडलं.
-
वयाच्या २६ व्या वर्षी नव्याने IIM अहमदाबादच्या ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये (BPGP) प्रवेश घेतला आहे. हा व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेला एक अनोखा ऑनलाइन एमबीए प्रोग्राम आहे.
-
नव्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ती मोठ्या संपत्तीची वारसदार आहे.
-
नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचे आजी आजोबा अमिताभ आणि जया बच्चन यांनी ५० कोटी किमतीचा त्यांचा जुहूतील आलिशान बंगला नव्याची आई श्वेता बच्चनच्या नावे केला.
-
नव्याचे वडील निखिल नंदा हे भारतातील आघाडीचा इंजिनिअरींग ग्रुप एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
-
एस्कॉर्ट्स कुबोटा ग्रुपची संपत्ती ७,०१४ कोटी रुपये आहे. एस्कॉर्ट्स कुबोटा कृषी यंत्रसामग्री, बांधकाम आणि रेल्वे उपकरणांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. निखिल नंदा यांच्याकडे कंपनीत ३६.५९ टक्के भागीदारी आहे. निखिल नंदा यांना १३.१ कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो.
-
नव्याने वयाच्या २१ व्या वर्षी फॅमिली बिझनेसमध्ये काम करू लागली.
-
नव्या आरा हेल्थची सह-संस्थापक आहेत, ही महिला-केंद्रित आरोग्य तंत्रज्ञान कंपनी आहे जी भारतातील महिलांसाठी परवडणारी आरोग्यसेवा पुरवते.
-
ती प्रोजेक्ट नवेली या एनजीओची संस्थापकदेखील आहे. ही एनजीओ कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि लैंगिक असमानतेविरोधात लढण्यासाठी मदत करते.
-
मीडिया आणि मनोरंजनक्षेत्रात नव्या तिच्या लोकप्रिय पॉडकास्ट व्हॉट द हेल नव्यासाठी ओळखली जाते.
-
पॉडकास्टमध्ये तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्यासोबत विविध विषयांवर आकर्षक चर्चा करते. तिचा हा पॉडकास्ट लोकप्रिय आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी श्वेता बच्चनच्या नावे केलेला प्रतीक्षा बंगला १७ हजार चौरस फूट जागेत पसरला आहे. यासाठी ५०.७ लाख मुद्रांक शुल्क त्यांनी भरले होते. हा बंगला नव्या आणि तिचा भाऊ अगस्त्य नंदा यांना वारसाहक्काने मिळेल.
-
याशिवाय, नव्याचे वडील निखिल नंदा यांची दिल्ली आणि इतर शहरांमध्ये इतर अनेक मालमत्ता आहे.
-
नव्याच्या वैयक्तिक संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, ती अंदाजे एकूण १६.५८ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती जाहिरातीतून पैसे कमावते.
-
(सर्व फोटो – नव्या नवेली नंदा)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या