-
दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जाते आणि त्यांच्या जयंतीदिनीच शिक्षक दिनही साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? की बॉलीवूडचे अनेक मोठे स्टार्सदेखील शिक्षिक राहिले आहेत.
-
कोण आहेत ते स्टार्स याबद्दलच आज आपण जाणून घेऊयात. (Photo: Kiara Advani/FB)
-
अनुपम खेर
चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अनुपम खेर यांच्या अभिनयाचे वेड कोणाला नसेल. २००५ मध्ये त्यांनी ‘Actor Prepares’ नावाची स्वतःची अभिनय संस्था सुरू केली ज्यामध्ये ते अभिनय शिकवतात. दीपिका पदुकोण, वरुण धवन, प्रिती झिंटा, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन ते कियारा अडवाणी यांसारखे स्टार्स त्यांच्या या संस्थेत शिकले आहेत. (Photo: Anupam Kher/FB) -
अक्षय कुमार
अक्षय कुमारने परदेशातून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याने स्वतः अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक खतरनाक स्टंट केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परदेशातून मार्शल आर्ट्स शिकल्यानंतर मुंबईत आल्यावर अक्षय कुमारने एक अकादमी उघडली होती. तिथे तो विद्यार्थ्यांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत असे. (Photo: Akshay Kumar/FB) -
सान्या मल्होत्रा
दंगल गर्ल सान्या मल्होत्रा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक चांगली डान्सर देखील आहे. अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी ही अभिनेत्री डान्स टीचर होती. (Photo: Sanya Malhotra/FB) -
चंद्रचूड सिंग
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी चंद्रचूड सिंग वसंत व्हॅली स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते. यासोबतच ते उत्तराखंडच्या दून स्कूलमध्ये इतिहासाचे शिक्षकही राहिले आहेत. (Photo: Chandrachur singh/Insta) -
कियारा अडवाणी
फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कियारा अडवाणी प्ले स्कूलमध्ये मुलांना शिकवायची. अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडते. (Photo: Kiara Advani/FB) -
नंदिता दास
फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नंदिता दास यांनी ‘ऋषी व्हॅली स्कूल’मध्ये शिकवले आहे. त्यांच्या थिएटरच्या काळामध्ये इथे त्या मुलांना शिकवायच्या. (Photo: Nandita Das/Insta)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका