-
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बडे स्टार्स मदतीसाठी पुढे आले आहेत आणि उघडपणे दान करत आहेत. सर्वात जास्त देणगी कोणी दिली आहे आणि कोणत्या स्टारने मदतीसाठी किती रक्कम दिली आहे ते जाणून घेऊयात.
-
बाहुबली फेम अभिनेता प्रभास यान दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. (Photo: Prabhas/Facebook)
-
RRR फेम जुनिअर एनटीआरने एक कोटी रुपये पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून दिले आहेत. (Photo: Jr NTR/Facebook)
-
नंदामुरी बालकृष्ण यांनी एक कोटी रुपये मदत दिली आहे. (Photo: Nandamuri Balkrushna/Facebook)
-
महेश बाबू याने १ कोटी रुपये मदत केली आहे. (Photo: Mahesh Babu/Facebook)
-
चिरंजीवी यांनीही एक कोटी मदतनिधी दिला आहे. (Photo: Chiranjeevi/Facebook)
-
अभिनेता अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये मदतनिधी दिला आहे. (Photo: Allu Arjun/Facebook)
-
नागार्जुन अक्किनेनी कुटुंबीयांनी एक कोटी मदतनिधी दिला आहे. (Photo: Nagarjun Akkineni/Facebook)
-
तर अभिनेता राम चरण यानेही एक कोटी रुपयांचा धनादेश मदत म्हणून राज्य सरकारकडे जमा केला आहे. (Photo: Ram Charan/Facebook)
-
पवन कल्याण: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांनी लोकांना मदत करण्यासाठी सर्वात मोठी रक्कम दिली आहे. अभिनेत्याने सहा कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ( Photo: Pawan Kalyan/FB)
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…