-
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे पालक बनले आहेत. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
दीपिका पदुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की रणवीर सिंगला आधीपासूनच आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा होती. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
काही काळापूर्वी रणवीर सिंगने आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याची इच्छा एका मुलीचा बाप होण्याची आहे आणि देवानेही त्याची इच्छा आता पूर्ण केली आहे. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी दोघेही ६ सप्टेंबरला सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी दोन्ही जोडपे मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसले, त्यानंतर दीपिका प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये चाहत्यांमध्ये ही आनंदाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, अलीकडे दीपिका पदुकोणच्या बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये लग्न केले. दोघांची पहिली भेट ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ आले. (Photo: Deepika Padukone/Insta)
-
जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१८ साली लग्न केले. या चित्रपटाशिवाय दीपिका आणि रणवीर पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि ८३ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. (Photo: Deepika Padukone/Insta)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई