-
अभिनेता अक्षय कुमार याचा आज वाढदिवस आहे.
-
बॉलीवूडचा खिलाडी आज ५७ वर्षांचा झाला आहे.
-
अक्षय कुमारचे चाहते जगभर आहेत.
-
अक्षयला वाढदिवसानिमित त्याच्या चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.
-
दरम्यान, अभिनेत्याचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकले नाहीत.
-
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
-
पण या चित्रपटाच्या आधी त्याचे एकामागोमाग एक प्रदर्शित झालेले ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले.
-
अक्षयचे बड़े मियाँ छोटे मियाँ, खेल खेल में हे चित्रपट मध्यंतरी आले होते पण तेही खास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत.
-
दरम्यान, अक्षयने आज वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘भूत बंगला’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
याशिवाय अक्षयचे सिंघम अगेन, कणप्पा, स्काय फोर्स, सरफिरा हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
-
याशिवाय ‘जॉली एल. एल. बी. भाग ३’ या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु असून हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
-
(Photos Source: Instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड