-
Malaika Arora Parents Divorce: मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली. (फोटो: joycearora/Instagram)
-
मलायकाची आई मल्याळी ख्रिश्चन आहेत, तर तिचे वडील पंजाबी होते. जॉयसी पॉलीकार्प आणि अनिल खूप वर्षांआधी विभक्त झाले. तेव्हा मलायका ११ वर्षांची होती. (फोटो: joycearora/Instagram)
-
अनिल अरोरा भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. (फोटो: joycearora/Instagram)
-
अनिल अनेकदा मलायका, तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान, बहीण अमृता आणि इतर कुटुंबातील सदस्यांसोबत कौटुंबिक कार्यक्रमात दिसायचे. (फोटो: joycearora/Instagram)
-
फिल्मफेअरला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत मलायका अरोराने तिच्या आई-वडिलांसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. (फोटो: joycearora/Instagram)
-
तिने सांगितलं होतं की त्यांच्या विभक्त होण्याचा तिच्यावर आणि तिची धाकटी बहीण, अमृता, जी त्यावेळी ६ वर्षांची होती, खूप खोलवर परिणाम झाला. “माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. पण कठीण काळ तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे धडे देखील शिकवतो.” असं ती म्हणाली होती. (फोटो: joycearora/Instagram)
-
मलायका पुढे म्हणाली, “माझ्या आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे मला एका नवीन आणि वेगळ्या दृष्टीकोनातून आईकडे बघता आलं. मी स्वावलंबी होण्यासाठी तिच्याकडून चांगली मूल्ये शिकले.” (फोटो: joycearora/Instagram)
-
अनिल आणि जॉयसी सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये आणि उत्सवांमध्ये त्यांच्या मुलींबरोबर असायचे. (फोटो: joycearora/Instagram)
-
“माझ्या अटींवर जीवन जगते,” असं मलायका म्हणाली होती. (फोटो: joycearora/Instagram)
-
(फोटो: मलायका अरोरा/इन्स्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’