-
‘ग्लोबल स्टॅटिस्टिक्स’ने २०२३ वर्षातील सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांचा डेटा आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर
केला आहे. -
या यादीत काही भारतीय चित्रपटांचा देखील समावेश आहे. जाणून घेऊया या चित्रपटांबाबत.
-
अमेरिकेचा ‘बार्बी’ चित्रपट जगभरात गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा चित्रपट आहे.
-
या यादीत अमेरिकन चित्रपट ‘ओपेनहाइमर’ हा गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला दुसरा चित्रपट आहे.
-
२०२३ साली प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’ गूगलवर तिसरा सर्वाधिक सर्च केला जाणारा चित्रपट आहे.
-
‘साउंड ऑफ फ्रीडम’ हा चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
-
अमेरिकन चित्रपट ‘जॉन विक-४’ हा या यादीत ५ व्या
क्रमांकावर आहे. -
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट गूगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा यादीत ६ व्या क्रमांकावर आहे.
-
‘एवरीथिंग एवरीव्हेअर ऑल एट वन्स’ हा चित्रपट या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे.
-
सनी देओल यांचा चित्रपट ‘गदर-२’ ने २०२३ साली बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. गुगलवर जगात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला हा ८ वा चित्रपट आहे.
-
अमेरिकन चित्रपट ‘क्रीड-२’ या यादीत नव्या क्रमांकावर आहे.
-
२०२३ साली प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठाण’ हा गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा १०वा चित्रपट आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख