-
सध्या देशात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.
-
सर्वजण मनोभावे गणपती बाप्पाची सेवा करत आहेत.
-
बाप्पाला येऊन पाच दिवस झाले आहेत तर आजचा सहावा दिवस आहे.
-
दरम्यान अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणीही विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत आणि श्री गणेशाचे दर्शन घेत आहेत.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेनेही पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे.
-
या दर्शनाचे फोटो तिने चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
याशिवाय हे फोटो शेअर करताना तिने छानसे कॅप्शन ही दिले आहे.
-
“यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे.. गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या मागील सीजन मध्ये दिसली होती, तर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली होती.
-
(सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इंन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल