-
सैराट चित्रपटातून पदार्पण करून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली चाहत्यांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू.
-
रिंकूने काल १५ सप्टेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
रिंकू नेहमीच तिच्या विविध गोष्टी फॅन्सबरोबर सोशल मीडियावरून शेअर करत असते.
-
तिचे चाहतेही तिच्यावर जीव टाकतात. तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त करतात.
-
रिंकूने या फोटोंमध्ये चमकदार चुडीदार ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर रिंकूने जाळीदार ओढणीची पेअर करत केसांत गजराही माळला आहे.
-
तिच्या कानातले, हातांवरील लाल नेलपॉलिश किंवा पायातील हिल्स या सर्वांमुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेलं आहे.
-
तिचा हा लूक चाहत्यांनाही खूपच भावला आहे.
-
या फोटोंना रिंकूने “तेरे बिन..” असं कॅप्शन दिलं आहे. विविध कमेंट्सद्वारे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो साभार : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार