-
आजकाल फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टार किड्स आहेत जे सतत लाइमलाइटमध्ये असतात. त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच आराध्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळाले. नवीन लूकमध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत आहे. समोर आलेल्या तिच्या ताज्या छायाचित्रांमध्ये ती तिची आई ऐश्वर्या राय बच्चनसारखीच सुंंदर दिसून आली.
-
दरम्यान, नुकतीच ऐश्वर्या राय बच्चन साऊथ स्टार चियान विक्रमसोबत ‘पोनियिन सेल्वन’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) SIMMA 2024 पुरस्कार मिळाला.
-
SIIMA 2024 दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन देखील उपस्थित होत्या.
-
ऐश्वर्या राय बच्चन काळ्या आणि सोनेरी अनारकली सिक्वेन्स वर्कसह बनवलेल्या चमकदार सूटमध्ये अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती.
-
त्याचबरोबर तिची मुलगी आराध्या बच्चनही सिल्व्हर आणि ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती.
-
आराध्या बच्चनने तिचा लूक आयलायनर आणि लिप ग्लॉसने पूर्ण केला. यावेळी आराध्या बच्चनची हेअरस्टाइल थोडी वेगळी पाहायला मिळाली. साइट पार्टिंगसह तिने केस कुरळे केले होते. आराध्याचा हा बदललेला लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली तेव्हा आराध्या बच्चन हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसली. आराध्याच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
आई आणि मुलीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत.
-
यादरम्यान ऐश्वर्या राय बच्चन दुबईमध्ये तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसली. (फोटो: SIIMA पुरस्कार/Insta)
-
(Photos Source : SIIMA Awards/Instagram)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या