-
महाराष्ट्रात असे एकही घर नसेल जिथे शिवाली परब कोणाला माहिती नसेल.
-
शिवाली परब आज तिच्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरांत पोहचली आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून शिवालीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली.
-
आता ती रुपेरी पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी तयार झाली आहे.
-
शिवालीने मागील आठवड्यात तिच्या येणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले.
-
तर आता तिने तिच्या चित्रपटाचे आउटफिटही परिधान केले आहे. या माध्यमातून शिवाली चित्रपटाच्या प्रमोशनच्या तयारीला लागली असल्याचे दिसत आहे.
-
हेच ते आउटफीट्स आहेत, शिवालीच्या येणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘मंगला’ असणार आहे.
-
हा चित्रपट मराठी असणार आहे. या चित्रपटाचे नाव प्रिंट असलेली साडी या छायाचित्रात शिवालीने परिधान केल्याचे दिसत आहे.
-
दरम्यान या साडीमध्ये शिवाली खूपच गोड दिसत आहे. तिने हे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनीही तिला कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ