-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सध्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर चांगलीच चर्चेत आहे.
-
‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेत जान्हवीने यापूर्वी काम केलेलं आहे.
-
मालिकेत तिने सानिया हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं.
-
जान्हवी किल्लेकर विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे.
-
अभिनेत्रीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर असं आहे.
-
तर, जान्हवीच्या मुलाचं नाव ईशान आहे.
-
किरण किल्लेकर यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. इंटनेट व केबलचा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे.
-
‘किरण किल्लेकर एंटरटेनमेंट अँड प्रोडक्शन हाउस’ असं त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. याशिवाय किरण आधी डान्स क्लास सुद्धा चालवायचे.
-
डान्स क्लासमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. हळुहळू दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन जान्हवी व किरण यांनी लग्नगाठ बांधली. ( सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम व किरण किल्लेकर फेसबुक )

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन