-
१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटाची धर्मेंद्र यांनी सांगितलेली आठवण चर्चेत आहे.
-
हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्ना यांनी आनंद ही भूमिका अजरामर केली आहे. मात्र आनंद या भूमिकेसाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली पसंती धर्मेंद्र यांना होती.
-
धर्मेंद्र यांनी नातवाच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जेव्हा त्यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी त्यांनी ‘आनंद’ चित्रपटाची आठवण सांगितली होती.
-
धर्मेंद्र यांनी सांगितले, “आम्ही बेंगलोरवरून परत येत होतो, त्यावेळी विमानात मला हृषिकेश दादाने ‘आनंद’ चित्रपटाची गोष्ट सांगितली होती. आपण हे असे करणार आहोत, वैगेरे मला सांगितले होते.
-
नंतर मला कळले, राजेश खन्ना यांना मुख्य भूमिकेसाठी घेतले असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.”
-
पुढे ते म्हणतात, “हृषिकेश मुखर्जींच्या या निर्णयाचा मला राग आला होता. मी त्याला याबद्दल जाब विचारायचे ठरवले.
-
मी मद्यपान केले होते आणि त्या नशेत मी त्याला रात्रभर फोन करत होतो.
-
त्या रात्री मी त्याला झोपूच दिले नाही. मी त्याला विचारले, “तू मला ही भूमिका देणार होतास, मला संपूर्ण गोष्ट सांगितलीस, मग तू त्याला ती भूमिका का दिलीस?”
-
हृषिकेश मुखर्जी मला सांगत राहिला, “धरम तू झोप, आपण सकाळी बोलू.” तो फोन कट करायचा आणि मी पुन्हा फोन लावून विचारायचो, “तू त्याला ती भूमिका का दिलीस?”, अशी आठवण धर्मेंद्र यांनी सांगितली होती.
-
‘आनंद’ चित्रपटाच्या या कटू अनुभवानंतरही धर्मेंद्र आणि हृषिकेश मुखर्जी यांनी भूतकाळ विसरत ‘चुपके चुपके’ आणि ‘गुड्डी’ यांसारखे चित्रपट एकत्र केले आहेत.
-
‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव आणि सुमिता सन्याल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
-
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. (सर्व फोटो सौजन्य: धर्मेंद्र इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख