-
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या रिॲलिटी क्विझ शो, कौन बनेगा करोडपती १६ च्या विशेष भागामध्ये संगीत आयकॉन, श्रेया घोषाल आणि सोनू निगम येणार आहेत.
-
एपिसोडला ‘सूर और ज्ञान का मिलन’ असे नाव देण्यात आले आहे.
-
केबीसीच्या एका ताज्या प्रोमोमध्ये, सोनू आणि श्रेया अमिताभ बच्चन यांचे सदाबहार गाणे “तेरे मेरे मिलन की ये रैना” गाताना दिसतात. हे गाणं अमिताभ आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
-
शोमध्ये श्रेया घोषालने तिच्या लहानपणापासूनची आठवणही शेअर केली. तिने पाहिलेला पहिला चित्रपट व्हीसीआरवर बिग बीचा खुदा गवाह हा होता.
-
अमिताभ यांनी अफगाणिस्तानमधील खुदा गवाहच्या शूटिंगचा पडद्यामागचा किस्सा सांगितलं. ते म्हणाले, “शूटिंगदरम्यान अनेक स्थानिक लोक जमायचे आणि त्यांची पारंपारिक गाणी सादर करायचे. यापैकी एक लोकप्रिय अफगाण लोकगीत होतं आणि प्रोडक्शन टीमला ते गाणं ऐकल्यानंतर ते चित्रपटासाठी योग्य असेल असं वाटलं.”
-
“अफगाणिस्तानमध्ये चित्रीकरण करणे सोपे नव्हते, खासकरून मजार-ए-शरीफमध्ये, जिथे आम्ही घोड्यांसह एक दृश्य शूट केले होते. तिथे खूप लोक जमायचे. मी विचारले की ते शूटिंग पाहत आहेत का? मला त्यांनी सांगितलं की ते फक्त प्रेक्षक नव्हते, ते आम्हाला राहण्यासाठी जागा देत होते, कारण तिथे राहायला हॉटेल्स नव्हते. ते लोक खरंच खूप दयाळू होते.”
-
हा विशेष भाग शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी प्रसारित होईल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”