-
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सिनेमाची भिंत आता हळूहळू तुटत आहे. तब्बल 10 वर्षानंतर भारतीय प्रेक्षकांची एका पाकिस्तानी चित्रपटासाठीची प्रतीक्षा संपत आहे.
-
इतक्या वर्षांनंतर भारतात प्रदर्शित होणाऱ्या पाकिस्तानी चित्रपटाचे नाव आहे ‘द लीजेंड ऑफ मौला जट’. हा चित्रपट पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि यशस्वी चित्रपट मानला जातो.
-
चित्रपटाचे दिग्दर्शक बिलाल लाशारी, अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होईल अशी माहिती शेअर केली आहे.
-
ही घडामोड विशेष आहे कारण 2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय सिनेमात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती.
-
तथापि, नोव्हेंबर 2023 मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती.
-
याच कारणामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. दरम्यान, ‘द लीजेंड ऑफ मौला जाट’ 12 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज झाला आणि 25 हून अधिक देशांमध्ये तो यशस्वी झाला.
-
या चित्रपटात पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय हमजा अली अब्बासी, हुमैमा मलिक, गौहर रशीद, शमून, शफकत चीमा, अदनान जाफर, फारिस साफी, अहसान खान आणि बाबर अली यांसारख्या अनेक स्टार्सनी या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होत आहे.
-
दरम्यान, फवाद आणि माहिरा या दोन्ही स्टार्सने यापूर्वी भारतीय सिनेमात काम केले आहे. फवाद ‘ए दिल है मुश्किल’, ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘खूबसूरत’ सारख्या चित्रपटांचा भाग राहिला आहे. तर माहिराने शाहरुख खानसोबत ‘रईस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photos : Stills From Film The Legend of Maula Jatt)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”