-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच एक मोठी मालमत्ता खरेदी केली आहे, जी चर्चेत आहे. दीपिकाने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे, त्याची किंमत जाणून सर्वांना आश्चर्य वाटेल. (Photo Source: @deepikapadukone/instagram)
-
रिअल इस्टेट सर्व्हिस प्लॅटफॉर्म Square Yards नुसार, दीपिका पदुकोणची कंपनी KA Enterprises LLP ने ही मालमत्ता खरेदी केली आहे. (Photo Source: @deepikapadukone/instagram)
-
प्रतिष्ठित बँडस्टँड जवळ सागर रेशम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये ही प्रीमियम हाउसिंग प्रॉपर्टी आहे. या सोसायटीमध्ये प्रीमियम 4 BHK आणि 5 BHK अपार्टमेंट उपलब्ध आहेत. (Photo Source: @deepikapadukone/instagram)
-
स्क्वेअर यार्ड्सनुसार, दीपिकाच्या कंपनीने खरेदी केलेले नवीन अपार्टमेंट 1,846 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. हा करार या महिन्यात पूर्ण झाला. (Photo Source: @deepikapadukone/instagram)
-
या करारामध्ये अंदाजे 1.07 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. या मालमत्तेची एकूण किंमत 17.78 कोटी रुपये आहे. (Photo Source: @deepikapadukone/instagram)
-
दरम्यान, KA Enterprises LLP ही एक ग्लोबल वेंचर इनव्हेसमेंट फर्म आहे. ही हाय ग्रोथ कंज्यूमर आणि कंज्यूमर-टेक कंपन्यांवर लक्ष केंद्रित करते. ती दीपिका आणि तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्या मालकीची आहे. (Photo Source: @deepikapadukone/instagram)
-
विशेष बाब म्हणजे हे अपार्टमेंट तिचा पती रणवीर सिंगच्या आईच्या म्हणजेच सासू अंजू भवनानी यांच्या घराशेजारी आहे. अंजू भवनानी यांनीही याच सोसायटीत 19.13 कोटी रुपयांना अपार्टमेंट विकत घेतले होते. (Photo Source: Jansatta)
-
त्याच वेळी, दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगने याच इमारतीत आधीच अनेक मजले खरेदी केले आहेत. अभिनेत्याने हा करार 2022 मध्ये 119 कोटी रुपयांना केला होता. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड