-
Bigg Boss Marathi च्या गेल्या चार पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
जेव्हा बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार असल्याचे समोर येताच चर्चांना उधाण आले होते. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
बऱ्याच वेळा रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाबाबत बोलले जाते. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
-
आता तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या मीनल शाहने बिग बॉसच्या पाचव्या पर्वाबद्दल वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: मीनल शाह इन्स्टाग्राम)
-
मीनल शाहने ‘स्टार मीडिया मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी महेश मांजरेकर या सीझनमध्ये असते, तर काय चित्र बदललं असतं? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. ((फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
यावर उत्तर देताना ती म्हणाली, “पूर्ण चित्र बदललं असत. मी एक सांगते की, रितेशसर त्यांच्या पद्धतीनं छान होस्ट करीत आहेत; पण ते या शोसाठी खूपच चांगले आहेत.” (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
“या शोसाठी असा कोणीतरी होस्ट पाहिजे, अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे, जी आमच्यासारख्या बंडखोर स्पर्धकांची ‘चांगली शाळा’ घेऊ शकेल.” (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
महेशसर त्यांच्यासाठी परफेक्ट आहेत. मी हे नाही म्हणत की, महेशसर माझ्या सीझनमध्ये होते आणि बाकीचे सीझन त्यांनी होस्ट केलं म्हणून त्यांना घेतलं पाहिजे. (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
मला वाटतं की, त्यांना माहितेय की अशा स्पर्धकांना कसं सरळ करायचं ते. (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
मला असं वाटतं की माझ्यासोबत खूप प्रेक्षकांना महेशसरांची आठवण येतेय. (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
त्यांची जी चावडी असायची, ती धमाल असायची. महेशसरांच्या होस्टिंगची आठवण येते.” (फोटो सौजन्य: महेश मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
रितेशसर त्यांच्या पद्धतीनं मुद्दे स्पर्धकांपर्यंत पोहोचवतात आणि एकदमच चांगल्या पद्धतीनं स्पर्धकांना समजवतात. पण, बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांना चांगली पद्धत समजत नाही. त्यांना ‘शाळा’ घेऊनच समजावलेलं कळतं. (फोटो सौजन्य: रितेश देशमुख इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख